शब्द कसे आणि कुठून कुठून प्रवास करून आपल्याकडे आले, याची माहिती देणारी, थक्क करणारी दोन मुलांसाठीची पुस्तके
या पुस्तकातला अतिशय वाखाणण्यासारखा भाग म्हणजे सुरुवातीलाच भाषेचा ऐतिहासिक विस्तृत पट मांडून त्याची सुबोध मांडणी केलेली आहे. भाषाशास्त्राचा इतका गुंतागुंतीचा इतिहास इतक्या सहज सोप्या आणि सरळ भाषेत सांगून मुलांना भाषेच्या इतिहास-भूगोलाची माहिती दिल्याबद्दल लेखकाचे आभारच मानावयास हवेत. यामुळे मुलांना भाषेच्या अभ्यासाची गोडी लागण्यास मदतच होईल.......